प्रतिनिधी / कारवार
चेन्नईहून हुबळीमार्गे गोव्याकडे तेलाची वाहतूक करणारा टँकर हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्त्यावरील अरेबैल फाटय़ाजवळ उलटून टँकरचालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने टँकरमधील गॅस लिक न झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यल्लापूरहून अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि पाहणी केली. जखमी चालक आणि क्लिनरला उपचारासाठीं यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.