केएससीए डीव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड विभागीय अ डीव्हिजन क्रिकेट स्पर्धेत हुबळी अकादमी अ संघाने युनियन जिमखाना संघावर 9 गडय़ांनी विजय मिळविला. ऑटोनगर केएससीए मैदानावर युनियन जिमखाना संघाने 22.3 षटकात सर्वबाद 49 धावाच केल्या. ऋषिकेश रजपूतने 5 चौकारासह 27 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. हुबळी अकादमीतर्फे महांतेश कुप्पण्णावरने 30 धावात 4, अर्जुन पाटीलने 6 धावात 3, मुद्दसर नझीरने 7 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल हुबळी अकादमी संघाने 8.3 षटकात सामना 9 गडय़ांनी जिंकला. पुनीत दीक्षितने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 47 धावा केल्या. जिमखानातर्फे चेतन चौगुलेने 1 गडी बाद केला.