हुबळी रेल्वेस्थानकाचे काम सुरू असल्याने रेल्वे रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हुबळी येथून धावणाऱया रेल्वे काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. बेळगावमधून धावणारी हुबळी-एलटीटी (मुंबई) ही रेल्वे 9 दिवस रद्द असणार असल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हुबळी-एलटीटी रेल्वे 20 ते 28 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. एलटीटी-हुबळी रेल्वे 21 ते 29 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रेल्वे विभागाने माहिती दिली आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे
बेंगळूर-गांधीधाम रेल्वे दि. 23 रोजी रद्द करण्यात आली आहे. गांधीधाम- बेंगळूर ही रेल्वे दि. 26 रोजी रद्द करण्यात आली आहे. जोधपूर-बेंगळूर 23 रोजी तर बेंगळूर-जोधपूर 25 रोजी रद्द करण्यात आली आहे. अजमेर-म्हैसूर 24 रोजी तर म्हैसूर-अजमेर 26 रोजी रद्द करण्यात आली आहे. ह. निजामुद्दीन-यशवंतपूर 22 व 27 रोजी तर यशवंतपूर- ह. निजामुद्दीन 26 व 28 रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.