बेळगाव
देसूर-खानापूर-गुंजी यादरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत असल्यामुळे हुबळी-दादर-हुबळी एक्स्प्रेस पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये दुसऱयांदा हुबळी-दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे क्र. 17317 हुबळी-दादर एक्स्प्रेस दि. 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान तर दादर-हुबळी एक्स्प्रेस (17318) दि. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.