हुबळी/प्रतिनिधी
हुबळी-धारवाड पूर्वे मतदार संघाचे आमदार प्रसाद यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. स्वतःला कोरोना झाल्याचे कळल्यानंतर आमदार प्रसाद यांनी जनतेला आवाहन केले आहे. त्यांनी जनतेची विकासकामे करण्यामध्ये सक्रिय होतो. हुबळीमध्ये कोरोना संक्रमीत भागास सतत भेटी देत होतो. बाधित भागास सतत भेट देत असल्याने गुरुवारी स्वेच्छेने कोविड चाचणी करून घेतली. शुक्रवारी कोरोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार, मी केआयएमएसमध्ये आवश्यक उपचार घेत आहे, असे म्हंटले आहे.
त्यांनी आपली प्रखर प्रतिकारशक्ती असून मी लवकरच बारा होऊन येन असं म्हंटल आहे. आमदार प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. खबरदारीच्या उपाय म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचीही कोविड चाचणी करून घेतली आहे.