हुबळी/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन ७ जूनपर्यंत वाढविला आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊनची नियमावलीही जाहीर केली आहे. पण अनेक नागरिक आणि वाहनचालकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. हुबळीमध्येही पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आज कारवाई केली.
हुबळी शहरात कोरोना नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. दरम्यान प्रशासन वारंवार कोविड नियमांचे पालन करण्यास सांगत आहेत. पण नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण शेवटी पोलीस त्यांना कारवाई करत शिस्त लावण्याचे काम करत आहेत.
पोलिसांनी मास्क न घालता दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याच्याकडून दंड आकारला. यावेळी त्याच्याकडून 250 रुपये दंड वसूल करण्यात आला आणि त्याला सक्तीने मास्क वापरण्यास सांगितले.