केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : वैभव, विरेंद्र, चिराग सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 10 गडय़ांनी तर अमृत पोतदार सीसीआय संघाने युनियन जिमखाना संघाचा 84 धावानी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. चिराग नाईक, विरेंद्र सांब्रानी (हुबळी स्पोर्ट्स क्लब) वैभव कुरूबागी (अमृत पोतदार) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 202 धावा जमविल्या. ओंकार वेर्णेकरने 1 षटकार 5 चौकारासह 40, सुदीप सातेरीने 1 षटकार 3 चौकारासह 36, आदर्श माळीने 2 चौकारासह 28, शिवम नेसरीकरने 4 चौकारासह 21, राहुल बजंत्रीने 1 षटकार, 2 चौकारासह 20, आकाश कटांबळेने 15, पार्थ पाटील, शुभम गौंडाडकर यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या.
हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे डॉमनिक फर्नांडिसने 30 धावात 4, गंगाराम पवारने 25 धावात 2, आदर्श प्रकाशन 28 धावात 2, तर विरेंद्र सांबरानी व साईप्रसाद रेड्डी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 38.4 षटकात बिनबाद 208 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. सलामीवीर विरेंद्र सांबरानीने 3 षटकार 10 चौकारासह नाबाद 107, चिराग नायकने 13 चौकारांसह नाबाद 95 धावा केल्या. या जोडीने पहिल्या गडय़ासाठी 208 धावांची भागीदारी केली.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अमृत पोतदार सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 295 धावा केल्या. त्यात वैभव कुरूबागीने 2 षटकार आणि 6 चौकारासह 85, स्वप्निल येळवेने 1 षटकार 10 चौकारासह 59, झिनत एबीएमने 2 षटकार व 3 चौकारासह 50, अमानखानने 4 चौकारासह 25, गौतम दिलीपने 19, रवी उकळीने 14, नवीन शिरगावीने 13 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे ऋतुराज भाटीने 55 धावात 2 तर पुरूषोत्तम जकांबल, चेतन चौगुले, दीपक राक्षे, अमेय भातकांडे, वैष्णव संघमित्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल युनियन जिमखाना संघाचा डाव 47.4 षटकात सर्वबाद 211 धावात आटोपला. दीपक राक्षे व वैभव संघमित्र यांनी प्रत्येकी 61, प्रवीण हिरेमठने 4 चौकारासह 33, शिवानंद पाटीलने 14 तर सर्फराज मुल्लाने 11 धावा केल्या. अमृत पोतदारतर्फे वैभव कुरूबागीने 30 धावात 3, अमान खानने 41 धावा 2 तर सुशांत कोवाडकर, रोहित दोडवाड, अधोक्षीत मानवी, झिनत एबीएम, स्वप्नील येळवे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.