बिजिंग
हुवाई कंपनीच्या चीफ फायनॅन्शीयल ऑफिसर मेंग वानझोऊ यांची नुकतीच चीनने कारागृहातून मुक्तता केली आहे. गेल्या 3 वर्षापासून सीएफओ मेंग या कारागृहात बंदीस्त होत्या. यानंतर चीनने कॅनडातील 2 नागरिकांची मुक्तता केली असल्याचे समजते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी ही माहिती दिली आहे. डिसेंबर 2018 पासून चीनमधील प्रसिद्ध कंपनी हुवाईच्या सीएफओ मेंग कॅनडातील कारागृहात बंदीस्त होत्या. त्या आता सुटकेनंतर मायदेशी चीनला रवाना होतील. मेंग यांना ताब्यात घेतल्यापश्चात दुसरीकडे कॅनडातील 2 नागरिकांना चीनने हेरगिरीप्रकरणी संशय घेऊन ताब्यात घेऊन कारागृहात डांबलं होतं. न्यायालयाने मेंग यांना सोडण्याचे आदेश दिले. हुवाईचे संस्थापक रेन झेंगफेई यांची कन्या आहे. मुक्ततेच्या आदेशानंतर लगेचच सरकारने एअर चायनाच्या विशेष विमानाने त्यांना चीनमधील शेनझेन शहरात पोहचवण्याची व्यवस्था केली. कॅनडातील कारागृहातील मायकल स्पावर व मायकल कोव्हरिग हेही मुक्ततेनंतर चीनमधून कॅनडाकडे विमानाने रवाना झाले आहेत.