अमेरिकेतील संशोधकांनी हृदयरोग ओळखण्यासाठी एका सोप्या पद्धतीचा शोध लावला आहे. त्यानुसार माणसाच्या डोळय़ांची विशिष्ट प्रकारे तपासणी केली असता त्याला हृदयरोग आहे की नाही? हे खात्रीपूर्वक समजू शकते. माणसाच्या डोळय़ात रक्ताभिसरण व्यवस्थित होत असेल तर बहुतेक वेळा त्याला हृदयविकार नसतात. मात्र, डोळय़ातील रक्ताभिसरणाचे प्रमाण कमी असेल तर ते जितक्मया प्रमाणात कमी आहे, तितक्मया अधिक प्रमाणात त्याला हृदयविकारांचा धोका संभवतो.
हृदय एखाद्या पंपाप्रमाणे कार्य करते. संपूर्ण शरीराला या पंपाद्वारे रक्ताचा पुरवठा होतो. या हृदयरूपी पंपात थोडा जरी बिघाड निर्माण झाला तरी शरीराच्या अगदी टोकाकडच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. याची चाचणी डोळय़ांची तपासणी केल्यानंतर होऊ शकते. डोळय़ांना रक्तपुरवठा कमी होत असेल तर हृदय किंवा धमन्या यांचे कार्य योग्य रीतीने चाललेले नाही, असा निष्कर्ष काढता येतो.
हा शोध लावताना साधारणतः 14 हजार रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात हे संशोधन करण्यात आले. या रुग्णांपैकी 84 जणांचे हृदयरोग नेत्रचिकित्सेतून उघड झाले. हे सर्व 84 रुग्ण हृदयविकाराने त्रस्त असल्याचे आढळून आले. तर अशाच प्रकारच्या 26 रुग्णांना पक्षाघाताचा विकार नंतरच्या काळात निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयासंबंधी कोणतीही चाचणी करताना प्रथम रुग्णाचे डोळे बारकाईने तपासावेत आणि डोळय़ांचा रक्तपुरवठा कशाप्रकारे सुरू आहे? याची चाचणी करावी, असा सल्ला या संशोधक डॉक्टरांनी सर्व इतर डॉक्टरांना दिला आहे.