बेळगाव : हॅपी टू हेल्प न्युट्रिशनतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. स्पर्धेमध्ये एकूण 72 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्वांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रे पाठविली होती.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- ‘अ’ गटात अनुक्रमे रेहा शिंदे, स्वरांजली कारेकर, तन्वी नंद्याळकर, अथर्व आडके, सिॆsश पाटील यांनी क्रमांक पटकाविले तर ‘ब’ गटात अनुक्रमे यश पाटील, अभिमान शेट्टी, पृथ्वीराज शिंदे, निहार मजुकर, निशांत सावंत यांनी क्रमांक मिळविले. प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. परीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर उपस्थित होते. भारती कैलास रांगणेकर यांनी पोषक आहाराचे महत्त्व विशद केले.