प्रतिनिधी/ सातारा
प्रपोज डे हा दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवडय़ातील दुसरा दिवस सर्वत्र उत्साहात साजरी झाला. या दिवसाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला व जोडीदाराला भेट वस्तू देऊन प्रपोज केला. सायंकाळी हॉटेल, आवडत्या ठिकाणी जावून हा दिवस साजरी केला. कॉलेज परिसरात तरूणाच्या व्हेलेंटाईन वीक ची चर्चा सुरू आहे.
व्हॅलेंटाईन वीकला रोझ डे ने सुरूवात झाली आहे. याच आठवडय़ातील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे साजरी करण्यासाठी सर्वत्र आनंदायी वातावरण होते. सकाळपासून गिफ्टच्या दुकानात तरूण-तरूणींनी गर्दी केली होती. दुकानदारांनी आकर्षक अशा भेटवस्तू ठेवल्याने प्रपोज डे चा आनंद द्विगुणीत झाला होता. टेडी, आंगठी, प्रेमाचा संदेश लिहलेले भेटकार्ड यांची खरेदी मोठया प्रमाणावर झाली. आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी कडे विशेष लक्ष देत भेटवस्तू खरेदी करण्यात आल्या. दिवसभर पर्यटनस्थळी गर्दी झाली होती. सायंकाळी हॉटेलमध्ये केक कापून आपल्या जोडीदारसोबत काहींनी हा दिवस साजरी केला.
सोमवारी कॉलेज परिसरात गर्दी होवू नये म्हणून पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. यामुळे विद्यार्थ्याना जास्त वेळ थांबून न देता कॉलेज परिसर मोकळा करण्यात आला. याउलट शहरातील काही कॅफेमध्येग्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यामुळे लॉकडाऊन नंतर ग्राहकांची संख्या वाढलेली दिसत होती. यांचा फायदा हॉटेल व कॅफे व्यवसायिकांना चांगला होत आहे.