वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या प्राग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रूमानियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपने एकेरीची अंतिम फेरी गाठताना आपल्याच देशाच्या बेगुचा पराभव केला. त्याचप्रमाणे बेल्जियमच्या मर्टन्सने या स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टॉप सीडेड हॅलेपने तासभराच्या कालावधीत बेगुचे आव्हान 7-6 (7-2), 6-3 असे संपुष्टात आणले. दुसऱया उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या मर्टन्सने झेकच्या प्लिसकोव्हाचा 7-5, 7-6 (7-4) असा पराभव केला.