लक्षिता भंडारी विद्यालयात प्रथम
प्रतिनिधी / पणजी
कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार शाळेने आपली 100 टक्के निकालाची परंपरा यंदा सलग 14 व्या वर्षीही कायम राखली. यावर्षी शाळेतून एकूण 120 विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. विद्यालयात लक्षिता भंडारी ही विद्यार्थिनी 96.3 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली.
हेडगेवार विद्यालयाने यावर्षीही 100 टक्के निकालाची पंरपरा कायम ठेवली असून नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात या विद्यालयाचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. एकूण 120 विद्यार्थ्यांपैकी 73 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. ही टक्केवारी 61 टक्के आहे. प्रथम श्रीणीमध्ये 42 (35 टक्के), द्वितीय श्रेणीमध्ये 5 (4 टक्के) तर उत्तीणवर्गात एकही विद्यार्थी पोहोचला नाही. मुख्याध्यापक विलास सतरकर यांनी या निकालाबद्दल समाधान केले. शाळेतील तीन विद्यार्थीवर्गाने सर्वोत्कृष्ट गुण पुकारले त्यात लक्षिता भंडारी (96.03 टक्के) निर्जरा प्रभू पाडगावकर (96.3 टक्के), किशन काणकोणकर (95.3 टक्के) व अंशुल मणेरकर (95.3 टक्के) हे विद्यार्थी चमकले. सतरकर यांनी सर्व विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले. विद्यार्थीवर्गाबरोबरच शिक्षक, शिक्षिकांनी देखील फार प्रयत्न केले. शिवाय लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईन शिक्षण सुरू ठेऊ विद्यार्थीवर्गाला शाळेने चांगला आधार दिला. त्यातून निकाल फार समाधानकार लागला.