ऑनलाईन टीम / हैदराबाद :
हैदराबादमधील मुलुगू जिह्यातील वेंकटपुरम गावात आज सकाळी सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलने एसआयची गोळय़ा घालून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:लाही गोळी मारली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल जखमी झाला असून, त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेंकटपूरम येथील सीआरपीएफच्या छावणीत ही घटना घडली.
हेड कॉन्स्टेबल आणि एसआय यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचे जवानांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.