जगभरात हेपेटाइपिस ए या व्याधीने ग्रस्त असणार्यांची संख्या मोठी आहे.
- एका अंदाजानुसार, दरवर्षी 15 लाखापेक्षा अधिक लोक या संक्रामक रोगाच्या कचाटय़ात येतात.
- हेपेटाइटिस एचा व्हायरस मुख्यतः दूषित खाद्य सामग्री आणि दूषित खाद्य सामग्री आणि दूषित पाणी यांद्वारे पसरतो. यापासून बचावासाठी काही उपाय निश्चित करता येतात.
- यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे ती स्वच्छता. याखेरीज पाणी नेहमी उकळून प्यावे.
- पाणी साठा होऊ देऊ नये. साठलेल्या पाण्याचा लगेच निचरा करावा. आपल्या घराच्या आसपासच्या भागाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच शरीराच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे. याने हा आजार पसरण्याची शक्यता कमी होते.
- संक्रमित व्यक्तीपासून दूर राहावे. अन्यथा हा आजार अशा व्यक्तीपासून अन्य व्यक्तीत सुद्धा पसरू शकतो.
- हेपेटाइटिस एचे लसीकरण करावे. हेपेटाइटिस एची लस एकदा घेतल्याने एक वर्षापर्यंत हा रोग होण्याची शक्यता राहात नाही. जर सहा महिन्यात दुसरी लस घेतल्यास 20 वर्षांपर्यंत या आजारापासून सुटका मिळू शकते.
– डॉ. मनोज कुंभार