ऑनलाईन टीम / कठुआ :
हेरगिरीच्या उद्देशाने पाकिस्तानातून आलेले कबुतर जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर ताब्यात घेण्यात आले आहे. कठुआचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या कबूतराला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे. या कबूतरासोबत सांकेतिक संदेश होता. कठुआच्या हिरानगर सेक्टरमधील मन्यारी गावातील रहिवाशांनी त्याला पकडले. त्यानंतर हे कबुतर स्थानिक पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले. या कबुतराच्या पायाला काही सांकेतिक क्रमांक असलेली रिंग लावण्यात आली आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.