ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयच्या एजंटानादेणाऱ्या सुरक्षा दलातील दोघांना अटक करण्यात आली आहे. गुप्तचर विभाग आणि राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली.
विकास कुमार आणि चिमणलाल अशी अटक करण्यात आलेल्या सुरक्षा दलातील दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुमार हा श्रीगंगानगरमधील लष्कराच्या दारुगोळा कारखान्यात कार्यरत होता. तर चिमणलाल हा लष्कराच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये कंत्राटी कामगार होता. हे दोघेही आयएसआयला भारतीय लष्करातील गुप्त माहिती पोहचवत असल्याचे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आले. लष्कराच्या गुप्तचर विभागाने ही माहिती राजस्थान पोलिसांना दिली. त्यानंतर गुप्तचर विभाग आणि राजस्थान पोलिसांनी या दोघांवर ऑपरेशन डेझर्ट चेस राबविले. त्यामध्ये हे पैशांसाठी आयएसआयला लष्कराची गुप्त माहिती पाठवत असल्याचे समोर आले. तेव्हा या दोघांना अटक करण्यात आली.
चिमणलाल हा दारुगोळा कारखान्यातील पाणी वाटपाच्या रजिस्टरचे दररोज आयएसआयला पाठवत होता. तर कुमार हा लष्करी अधिकारी आणि दारूगोळ्याच्या सज्जतेबाबत माहिती पाठवत असल्याचे त्यांनी कबुल केले आहे.