बेळगाव : लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त गुजरात भवनमध्ये रुग्णवाहिका चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे संच देण्यात आले. बाराशे रुपयांचे एकूण 45 किट्स यावेळी देण्यात आले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे नवोदय स्कूल, गांधीनगर येथील 21 शिक्षकांनासुद्धा किट देण्यात आले. यासाठी भूपेंद्र पटेल व लायन राजशेखर हिरेमठ यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. याप्रसंगी अध्यक्ष लायन श्रीधर उप्पीन, ला. सोमशेखर चोण्णद, भारती वडवी, सोमनाथ कोलकी, सतीश बाळेकुंद्री, अशोक काटवे, श्रीकांत हलभावी, जयश्री हलभावी व उदय वडवी उपस्थित होते.
Previous Articleजुने बेळगाव परिसरात युवकांनी केले निर्जंतुकीकरण
Next Article बी-बियाणे वितरणाकडे पशुसंगोपन खात्याचे दुर्लक्ष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.