युटय़ुबरने मोडला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड
जर एखादा व्यक्ती कुठलीही गोष्टी प्राप्त करण्यासाठी स्वतःला झोकून देत असेल तर त्याला अवश्य यश मिळते असे म्हटले जाते. अशीच कामगिरी एका डच युटय़ूबर्सनी केली आहे. डच युटय़ूबर्सच्या जोडीने हेलिकॉप्टरवर लटकून एका मिनिटात सर्वाधिक पूल-अपचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. आर्मेनियाच्या रोमन सहराडियन याच्याकडून नोंदविण्यात आलेला 23 पूल-अपचा मागील विक्रम त्यांनी मोडला आहे.
स्टेन ब्राउनी आणि अर्जेना अल्बर्स यांनी एका मिनिटात सर्वाधिक पूल-अप केले असून त्यांनी 6 जुलै रोजी बेल्जियमच्या एंटवर्पमध्ये होवेनन एअरफिल्ड येथे विक्रम स्वतःच्या नावावर केला. अर्जेनने हेलिकॉप्टरवर लटकून हवेतच 24 पूल-अप काढले. अर्जेनने आर्मेनियाच्या रोमनचा मागील विक्रम मोडीत काढला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने स्वतःच्या युटय़ूब हँडलवर शेअर केला आहे.
स्टेन ब्राउनी आणि अर्जेब अल्बर्स दोघेही नेदरलँडचे आहेत. विश्वविक्रम करण्यासाठी हेलिकॉप्टर शोधण्यता या दोघा ऍथलिटांनी 15 दिवस घालविले होते. यादरम्यान दोघांनीही विश्वविक्रमाकरता मोठी मेहनत केली होती. त्यानंतरच हेलिकॉप्टरवर लटकून एका मिनिटात सर्वाधिक पूल-अपचा विक्रम त्यांनी स्वतःच्या नावावर केला आहे. ब्राउनी हा कॅलिस्थेनिक्सचा तज्ञ आहे. दोन्ही डच युटय़ूबर्स स्वतःच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्हिडिओला लोकांची मोठी पसंती मिळत असते.