ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
तामिळनाडूतील कुन्नुर येथे लष्कराचे एम आय 17 व्ही 5 या प्रकारचे हेलिकॉप्टर सरलष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटूंबीय प्रवास करत असताना कोसळले. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसेच इतर १४ वरिष्ठ अधिकारी ही प्रवास करत होते. बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत असुन अकरा जणांचे मृत्यू झाल्याचे समजते आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीस्थित बिपिन रावत यांच्या घरी भेट दिली आहे.
मात्र बिपीन रावत यांना उपचारासाठी तामिळनाडूमधील वेलिंग्टन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर केंद्रीय स्तरावर बैठका सुरु असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासह केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला आहे.