हवाई दल प्रमुखांचे प्रथमच उघड भाष्य : शत्रूराष्ट्रांकडून असलेल्या धोक्याचेही मूल्यांकन होणार
हैदराबाद / वृत्तसंस्था
तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जात असून सर्व बाजूंनी तपास केला जाणार आहे. या अपघातापासून धडा घेत भविष्यात प्रत्येक उड्डाणासाठी व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलची समीक्षाही केली जाईल. इतकेच नाही तर आम्ही सतत पाकिस्तान आणि चीनकडून येणाऱया धोक्मयांचे मूल्यांकन करत आहोत. शिवाय त्याबद्दल आम्ही अधिक जागरूक आहोत, अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली. मागील पंधरवडय़ात घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर हवाईदल प्रमुखांनी प्रथमच अशाप्रकारे उघड भाष्य केले आहे. हैदराबादमधील दुंडीगल एअर फोर्स अकादमीच्या संयुक्त पदवी परेडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱयांचे निधन झाले. देशाच्या तिन्ही दलातील लष्कर प्रमुखाचा असा अपघाती मृत्यू होणे ही देशासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करावी अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीर हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हेलिकॉप्टर तपासात सर्व बाजू आणि सर्व घटकांवर आधारित तपास करत आहोत. या तपासात कोणतीही बाजू वगळण्यात येणार नाही. शिवाय आतापर्यंत झालेल्या तपासात काय माहिती मिळाली आहे ती लगेच जाहीर करणे योग्य होणार नाही. या दुर्घटनेतील प्रत्येक गोष्ट तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीन-पाकिस्तानशी टक्कर देण्यास सज्ज
हवाई दल पाकिस्तान आणि चीनकडून येणाऱया धोक्मयांचे सतत मूल्यांकन करत आहे. आम्हाला परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्याची स्पष्टोक्ती हवाई दल प्रमुखांनी दिली. चीनसोबतचा संघर्ष सुरूच आहे. लडाखमधील काही भागांमध्ये विलगीकरण झाले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. या भागात हवाई दलाची तैनाती सुरूच राहणार आहे. आम्ही दोन्हीही शत्रूराष्ट्रांशी कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हवाई दल अकादमीच्या पदवीदान परेडमध्ये बोलताना चौधरी म्हणाले की, हवाई दल बदलाच्या टप्प्यातून जात आहे. राफेलसारख्या अनेक नवीन लढाऊ विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. सध्या 36 पैकी 32 राफेल देशात दाखल झाली आहेत. उर्वरित 4 पैकी 3 विमाने फेब्रुवारीमध्ये येतील. या विमानांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून हवाई दलाचे बळ वाढविण्याच्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
कॅडेट्सचे कौतुक
एअर चीफ मार्शल चौधरी यांनी वायुसेना अकादमीच्या कॅडेट्सचे कौतुक केले. तुमची दर्जेदार क्षमता भविष्यात सुरक्षित आणि प्रभावी ऑपरेशनचा आधार बनतील. सशस्त्र दलाचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी हवाई दलाला तरुण अधिकाऱयांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक
हवाई दल प्रमुखांनी जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सीडीएस बिपिन रावत, मधुलिका रावत आणि अन्य 12 जणांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असून, वरि÷ अधिकारी अपघाताची चौकशी करत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येक पैलूचा विचार केला जात आहे. तांत्रिक बिघाड की अपघात कशामुळे झाला, हे तपास प्रक्रियेनंतर कळेल, असेही त्यांनी सांगितले.