दिल्ली / प्रतिनिधी
हेलीकॉप्टर अपघातात शहीद झालेले ले. कर्नल हरजिंदरसिंग यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल हरजिंदरसिंग यांची मुलगी प्रीत कौरने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सेनांचे प्रमुख उपस्थित होते.
तसेच लांसनायक बी. साईतेजा यांच्यावर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात त्यांच्या गावी येगुवारेगदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नायक गुरसेवकसिंग यांच्यावर तरनतारनमधील गाव डोड सोधियनमध्ये अंत्यसंस्कार झाले. नायक गुरसेवकसिंग यांचा ४ वर्षांचा मुलगा गुरफतेह याने अंत्यसंस्कार केले. गुरसेवक यांनी दीड महिन्यांपूर्वी दिलेला गणवेश परिधान करूनच गुरफतेहने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. गुरसेवक यांच्या पत्नीने मुलालाही सैन्यदलात पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. सैन्य हवालदार सतपाल राय यांचे पार्थिव दार्जिलिंगजवळील त्यांचे गाव तकदाह येथे पोहोचले असून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जातील.