नागरिकांची बैठकीत मागणी, गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या शहर कार्यालयात अनेक समस्या असून नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. कर्मचाऱयांची कमतरता असल्याने तासन्तास रांगांमध्ये थांबावे लागत आहे. तसेच कर्मचाऱयांवर अधिकाऱयांचा वचक नसल्याने गलथान कारभार सुरू आहे. त्यामुळे हेस्कॉमने शहर कार्यालयातील कारभार सुधारावा, अशी मागणी नागरिक व कॉन्ट्रक्टर असोसिएशनने शनिवारी आयोजित तक्रार निवारण बैठकीत केली.
शनिवारी रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हेस्कॉमने अधिक्षक अभियंता गिरीधर कुलकर्णी यांच्यासमोरच समस्यांचा पाढा वाचला. यावेळी शहर कार्यकारी अभियंता एम. टी. अप्पण्णावरदेखील उपस्थित होते. यावेळी टेम्पररी मीटर, रीचार्ज याविषयी चर्चा करण्यात आली.
शहर हेस्कॉम कार्यालयात कर्मचाऱयांची वानवा आहे. सेक्शन ऑफिसर नसल्याने प्रभारींवर पदभार सोपविण्यात आला आहे. तसेच कार्यालयीन कामकाजासाठीही कर्मचारी अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने कर्मचाऱयांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली.
प्रत्येक उपविभागाला हवे मीटर विक्री केंद्र
शहरात मोठय़ा प्रमाणात विद्युत मिटरची आवश्यकता असतानाही मीटर उपलब्ध होत नाहीत. नागरिकांना मीटर उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागत आहे. शहर व ग्रामीण भागासाठी एकच ठिकाणी मीटर उपलब्ध असल्याने गर्दी होत असल्याची समस्या मांडण्यात आली. यावेळी प्रत्येक उपकेंद्रासाठी स्वतंत्र मीटर विक्री केंद्र सुरू करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर, विनोद करूर, सेक्शन ऑफिसर प्रवीण बरगाळे, जगदीश मोहिते, बसवराज हैबत्ती, कळ्ळीमनी, हावेरी, कनि÷ अभियंता एस. एस. किणयेकर, कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष आर. एम. कुंटे, उपाध्यक्ष गुरुराज प्रभू, सेपेटरी अमर सरदेसाई, उत्तम रजपूत, भूपाल देसाई, पवन सालगुडे, संदीप हुंदरे, रत्नापगोळ यांच्यासह इतर उपस्थित होते..