रत्नागिरीहून कोल्हापूरमार्गे ट्रकने जाताना ताब्यात, सीपीआरमध्ये स्वॅब, जिल्हय़ात तेरावा कोरोना रूग्ण
प्रतिनिधी/कोल्हापूर
मुंबईहून रत्नागिरीमार्गे कोल्हापूरला ट्रकने येत असलेल्या आंध्र प्रदेशातील तरूणाला पोलिसांनी ताब्य़ात घेतले. त्याची सीपीआरमध्ये तपासणी केली. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट गुरूवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हय़ातील तो तेरावा कोरोना रूग्ण ठरला आहे.
हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथील 25 वर्षीय तरूण मुंबईत कामाला होता. तो मुंबईहून रत्नागिरीमार्गे गावी निघाला होता. तो ट्रकने कोल्हापुरात येत होता. सोमवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अन् उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा रिपोर्ट बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तो जिल्हय़ातील 13 वा कोरोना रूग्ण ठरला आहे.