हैदराबाद / वृत्तसंस्था
ग्रेटर हैदराबाद महापालिकेसाठी मंगळवार, 1 डिसेंबर म्हणजेच आज मतदान होणार आहे. भाजपने या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना उतरवल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीची देशभरात चर्चा असून निकालाकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. भाजपने प्रचारात ‘महापौर आपलाच असेल’ असा दावा केला होता. तर, एमआयएमच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केल्यामुळे प्रचारात रंगत वाढली होती. गेल्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागा मिळवत येथे सत्तास्थान मिळवले होते. येथे एकूण 150 वॉर्ड असून यंदा 1 हजार 122 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.