वृत्तसंस्था/ हैद्राबाद
येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेतील सामन्यात हैदराबाद ब्लॅक हॉक्सने चेन्नई ब्लिट्झचा 16-14, 15-11, 15-14, 15-7, 15-13 अशा 5-0 सेट्समध्ये फडशा पाडत तीन गुण वसूल केले.
या सामन्यात हैदराबाद संघातील जी एस. अखिन तसेच एस. प्रफुल्ल व गुरूप्रशांत यांची कामगिरी दर्जेदार झाली. या स्पर्धेत सामना जिंकणाऱया संघाला दोन गुण दिले जात आहेत पण हैदराबाद संघाने हा सामना 5-0 अशा सेट्समध्ये एकतर्फी जिंकल्याने त्यांना जादा एक गुण मिळाला. या सामन्यात हैदराबाद संघातील गुरूप्रशांतला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. हैदराबाद संघाचा या स्पर्धेतील चार सामन्यातील हा दुसरा विजय आहे. कालीकत हिरोज आणि बेंगळूर टॉरपेडोज यांच्याते सामना खेळविला जात आहे.