वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या टेनिस प्रिमियर लीग स्पर्धेत हैद्राबाद स्ट्रायकर्स आणि मुंबई लेऑन आर्मी यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हैद्राबाद स्ट्रायकर्सने चेन्नाई स्टेलॉन्सचा 42-38 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले तर दुसऱया एका सामन्यात मुंबई लेऑन आर्मीने विद्यमान विजेत्या पुर्ण जॉगर्सचा 42-38 असा फडशा पाडला. या उपांत्य लढतीत पहिल्या तीन रबर्समध्ये दोन्ही सामने 30-30 असे बरोबरीत होते पण त्यानंतर पुरूषांच्या दुहेरी सामन्यातील विजयाने निकाल निश्चित केला. हैद्राबाद स्ट्रायकर्सच्या करमन कौरने चेन्नाई स्टेलॉन्सच्या समंथा शरणचा 11-9 असा पराभव करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले.