गेल्या वर्षभरापासून जगभरातील औषध कंपन्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागल्या आहेत. आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस तयार केली आहे. दुसरीकडे, डॉक्टरांकडून कोविडच्या रुग्णांवर उपचारासाठी मलेरिया, एचआयव्ही किंवा अन्य संसर्गजन्य आजारावर असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. त्याचवेळी संशोधकांना या आजाराचा उपचार करण्यासाठी आणखी एक औषध सापडले असून त्यापासून कोरोना रुग्णावर उपचार करणे शक्य आहे.
- संशोधकांच्या मते, कोविड रुग्णांवर हेपेटाइटिसच्या औषधांचा वापर केल्यानंतर त्यांच्यात रिकव्हरी आढळून आली.
- यासाठी ज्या कोविड-19 बाधित रुग्णांत किरकोळ लक्षणे होती, त्यास पेगिनटेरफेरॉन-लॅम्ब्वहाचे औoषध देण्यात आले. हे औषध नैसर्गिक रुपाने आढळून येणार्या प्रोटीनचेच मानवनिर्मित रुप आहे. हा घटक इम्यून सिस्टिम सेल्सला इन्फेक्शनच्या ठिकाणी बोलावून श्वसनविकारावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. लॅन्सेट रिस्पेरेटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ज्या रुग्णांना पेगिनटेरफेरॉन-लॅम्ब्वहाचा डोस दिला, अशा रुग्णांत प्लेसेबो ग्रुपच्या तुलनेत सात दिवसांच्या आत संसर्ग नष्ट करण्याची क्षमता चार पटीने अधिक दिसून आली.
- टोरँटो सेंटर फॉर लिव्हर डिसिज, यूनिव्हर्सिटी हेल्थ नेटवर्कच्या टीमच्या मते, हे औषध कोविड रुग्णावर गुणकारी आहे. डॉ. जॉर्डन फेल्ड यांनी म्हटले की, या औषधाचा वापर करुन कोराना रुग्ण लवकर बरा करता येऊ शकतो. विशेषतः सध्याच्या काळात संसर्गाचे वेगवेगळे स्ट्रेन समोर येत असून ते वेगाने पसरत आहे. दुसरीकडे लशींशिवाय अँटीबॉडीजच्या उपचाराचा परिणाम कमी दिसत आहे. अशा वेळी हे औषध उपयुक्त ठरु शकते.
- पेगिनटेरफेरॉन-लॅम्ब्वहाचे औषध हे काही काळापूर्वी लष्करातील जवानांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दिले जात होते. ज्यांच्यावर या औषधांची प्रायोगिक तत्त्वांवर चाचणी केली गेली, त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाण चांगले राहिले आणि त्यांना रुणालयात दाखल होण्याची गरज भासली नाही. एवढेच नाही तर ज्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक होते, अशा मंडळींत या औषधाचा प्रभाव चांगला दिसून आला.
- एका अभ्यासानुसार पेगिनटेरफेरॉन-लॅम्ब्व्हाचे औषध घेणार्या रुग्णांतील संसर्ग 80 टक्के कमी होण्याची शक्यता दिसून आली. त्याचवेळी प्लेसबो गटात हे प्रमाण 38 टक्के होते. या प्रयोगासाठी संशोधनकर्त्यांनी मे 2020 ते नोव्हेंबरदरम्यान 60 जणांवर चाचणी केली.
– प्रा. विजया पंडित