नवी दिल्ली :
हॉकी इंडियातर्फे ऑनलाईनद्वारे खास बैठक 13 मे रोजी आयोजित केली आहे. या बैठकीत भारताच्या राष्ट्रीय पुरूष आणि महिला हॉकी संघांना ऑलिंपिक स्पर्धा पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भारतीय पुरूष, महिला राष्ट्रीय हॉकी संघांना ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे प्रमुख नरेंद्र बात्रा हे या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. चालू वर्षांच्या कालावधीत हॉकी इंडियातर्फे आयोजित करण्यात येणाऱया राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या आराखडय़ा संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना संकटामुळे थांबविण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील हालचाली पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेला निरीक्षणाचा अहवाल देण्याबाबत चर्चा केली जाईल.