कासेगाव / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील आशियाई महामार्गानजीक असलेल्या हर्ष हॉटेलला आज (दि.२७ रोजी) पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या भीषण आगीत ७ फ्रिज, टीव्ही संच, फर्निचर, सीसीटीव्ही यंत्रणा, वायरिग, मीटर, किराणा साहित्य, पीओपी. जळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत हॉटेल मालक विजय निकम यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, पहाटे चारच्या दरम्यान अचानक लाईट गेली व आली, होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वायरिग, मीटर, ७फ्रिज, टीव्ही, फर्निचर, सीसीटीव्ही यंत्रणा, यांनी पेट घेतला व त्याच्या ज्वाला गॅससिलेंडरला लागून एका २५% भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे आगीची तीव्रता जास्तच वाढून स्वयपाकासाठी असणारी मोठ मोठी पातेली, भांडीकुंडी देखील वितळून गेली होती. यावेळी भरलेले सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. भरलेला सिलेंडरचा स्फोट झाला असता तर इमारतीचे मोठे नुकसान झाले असते. आग लागलेली समजताच २० मिनिटात अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली व आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत हॉटेल मालक विजय निकम यांनी कासेगाव पोलीसठाण्यात फिर्याद दिली असुन सदर घटनेचा पंचनामा स.पो.नि. अविनाश मते, तपासी अंमलदार सचिन चव्हाण, विठ्ठल कोकाटे, आनंदा चव्हाण यांनी केला अधिक तपास पो. ह. सचिन चव्हाण करत आहेत.