मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुतोवाच
प्रतिनिधी/ मुंबई
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून गेली साडेतीन महिने बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स, लॉज ग्राहकांसाठी लवकरच खुली होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल्स असोसिएशन पदाधिकार्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हॉटेल्स सुरू करण्यासाठी सशर्त मंजुरी देण्याचे सूतोवाच केले.पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली जात आहे. ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही. मात्र राज्य सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल. आज जे स्थानिक कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना कामावरून काढू नका. या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.
स्वयंशिस्त महत्वाची : आदित्य ठाकरे
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि इतर मोठय़ा शहरात सरकारने सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला. या सगळ्या प्रयत्नात हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली . कोरोनानंतर हॉटेल उद्योग परत जोमाने उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वतरूला नियम घालणे महत्वाचे आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत कोण काय म्हणाले
हॉटेल्स 100 टक्के लगेच सुरु करत येणार नाही. पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करीत आहोतश्
संजय कुमार
मुख्य सचिव
हॉटेल्स सुरु करताना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्सचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल
अजोय मेहता
मुख्यमंर्त्यांचे प्रधान सल्लागार
हॉटेल उद्योगाला खेळते भांडवल आवश्यक आहे. सरकारने आमच्याकडेही कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकर्या जात असताना आम्ही आमच्या कर्मचार्यांच्या चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोतश्
गुरुबक्ष सिंग कोहली
इंडियन हॉटेल्स असोसिएशन