अजून किमत निश्चित नसल्याची माहिती : 6.81 इंच आकाराचा मिळणार डिस्प्ले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘हॉनर’ने आपला नवीन एक्स 9 5-जी स्मार्टफोन मलेशिया येथे सादर केला आहे. सदरचा स्मार्टफोन हा विशेष युजर्सकरीता तयार करण्यात आला असून जो कमी बजेटमध्ये खरेदी करता येणार असल्याचेही कंपनी म्हटले आहे. या फोनमध्ये 6.81 इंच पूर्ण एचडीसह एलसीडी डिस्प्लेसोबत 120 एचझेड रिप्रेश रेटमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 695 5-जी नेटवर्क प्रोसेसरसोबत 8 जीबी रॅम राहणार आहे. ट्रिप्पल रिअर कॅमेऱयासोबत 4,800 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार असून ज्यात 66 डब्ल्यू सुपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
मात्र कंपनीने फोनचे इतर फिचर्स आणि त्याच्या किमती संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. त्याबाबतचा खुलासा 29 मार्च रोजी सायंकाळी 8.30 नंतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
फिचर्स ः
w नवीन एक्स आवृत्तीची उत्पादने होणार सादर
w हॉनर एक्स9 5जी मिडनाईट ब्लॅक, ओसियन ब्लॅक, ओसियन ब्लू आणि टाइटेनियम सिल्वरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
w डब्बल नॅनो सिम सपोर्ट करणार
w मॅजिक युआय 4.2 स्किन ऑपरेटिंग सिस्टमवर रन करता येणार
w अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत होणार उपलब्ध