वृत्तसंस्था/ शारजा
हॉलंड संघातील अष्टपैलू रेयान डुश्चेने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 संघामध्ये हॉलंडला स्थान मिळविता आले नाही. त्यानंतर त्याने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
41 वर्षीय डुश्चेने वनडे क्रिकेटमध्ये 67 धावांच्या सरासरीने 1541 धावा तर टी-20 प्रकारात त्याने 41 धावांच्या सरासरीने 533 धावा जमविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या डुश्चेने 2006 साली लंकेविरूद्ध वनडे सामन्यात आपले आंतराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने 33 वनडे आणि 24 टी-20 सामन्यात हॉलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.