अभिनेते शॉन कॉनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन
लंडन / वृत्तसंस्था
जेम्स बाँडची भूमिका साकारणारे अभिनेते सीन कॉनेरी (शॉन कॉनेरी) यांचे शनिवारी वयाच्या 90 व्या वषी बहामा येथे निधन झाले. त्यांनी सहा चित्रपटात बाँडची भूमिका साकारली होती. यशस्वी सिनेकारकिर्दीमुळे त्यांचा ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर तीन गोल्डन ग्लोब आणि दोन बाफ्ता पुरस्कारही त्यांनी मिळविले होते.
कॉनेरी यांनी जगभरातील सिनेरसिकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत ‘जेम्स बाँड’ची भूमिका अजरामर केली होती. शॉन कॉनेरी यांनी अनेक चित्रपट साकारले. मात्र जेम्स बाँड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला. कॉनेरी यांच्या जाण्याने जगभरातील कला-चित्रपट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मुलगा जेसन कॉनेरी यांनी त्यांच्या निधनाची माहिती देत गेल्या काही काळापासून ते आजारी असल्याचे स्पष्ट केले. यावषी ऑगस्टमध्ये त्यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला होता.
सहा चित्रपटांमध्ये जेम्स बॉण्डची भूमिका
डॉक्टर नो, फ्रॉम रशिया विथ लव, गोल्डफिंगर, थंडरबॉल, यू ओनली लिव ट्वाईस, डायमंड्स आर फॉरेवर या चित्रपटांमध्ये कॉनेरी यांनी जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. तर मरीन, मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस, द मैन हु वुल्ड बी किंग, द नेम ऑफ द रोज, हाईलैंडर, इंडियाना जोन्स एंड द लास्ट प्रुसेड, द हंट फॉर रेड ऑक्टोबर, डैगनहार्ट, द रॉक, एंड फाइंडिंग हे त्यांचे चित्रपटही बहुचर्चित ठरले.