आलिया भट्ट बॉलिवूडच्या सर्वात गुणवान अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘राजी’, ‘डियर जिंदगी’ यासारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम केलेली आलिया स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावरही चर्चेत असते. आलिया अन् रणवीर कपूर यांच्या विवाहाचा विषय चर्चेत आहे. याचदरम्यान आलिया आता प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदूकोननंतर हॉलिवूडमध्ये नाव कमाविण्यासाठी सज्ज असल्याचे वृत्त आहे.
आलियाला हॉलिवूड टॅलेंट एजेन्सी डब्ल्यूएमई म्हणजेच विलियम मोरिस एंडेवयर एंटरटेनमेंटने करारबद्ध पेले आहे. डब्ल्यूएमई ही एजेंन्सी कॅलिफोर्नियातील आहे.
आलिया भट्ट स्वतःच्या पहिल्या हॉलिवूडपटाची घोषणा पुढील वर्षी करणार असल्याचे मानले जात आहे. आलिया स्वतःच्या नव्या चित्रपटाबद्दल अत्यंत उत्सुक आहे. आलिया ही हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सची मोठी चाहती असून तिच्याच शैलीत चित्रपटांमध्ये काम करू इच्छिते.
आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर आलिया, रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की कहानी’ चित्रपटातही काम करत आहे. आलियाकडे बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ आणि अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हे चित्रपट देखील आहेत.