ऑनलाईन टीम / अमेरिका :
यशाच्या शिखरावर विराजमान असणारा हॉलिवूड स्टार टॉम क्रूज आता अंतराळात शूटिंग करताना दिसणार आहे. टॉम क्रूज आणि एलॉन मस्क्स स्पेस एक्स नासा सोबत एकत्र येऊन चित्रपट करणार आहेत. या चित्रपटाच शूटिंग अंतराळात होणार आहे.
या वृत्ताला दुजोरा देत, नासाकडूनही एक ट्विट करण्यात आले आहे. नासाचे ॲडमिनीस्टेटर जीम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, नासा आपला पुढील चित्रपट टॉम क्रूज सोबत करत असून या चित्रपटाचे शूटिंग स्पेस स्टेशनमध्ये करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नवीन जनरेशनमधील इंजिनिअर, सायंटिस्ट मदत करणार आहेत.
दरम्यान, अंतराळात चित्रीत होणारा हा पहिलाच चित्रपट असून याला एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानले जात आहे. तसेच या चित्रपटासोबत जोडलेले एलॉन मस्क्स यांनी स्वतः नासाच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर दिले असून ते म्हणतात की, ‘खूप मजा येणार आहेे’, असे लिहिले आहे.