ऑलाईन टीम / लंडन :
कोरोना चा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यातच आता या विषाणूंमुळे हॉलिवुड चा प्रसिद्ध अभिनेते अँड्र्यू जॅक यांचा मृत्यू झाला आहे. ते 76 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेले काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचारा दरम्यान काही वेदना झाल्या नव्हत्या. मात्र काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अँड्र्यू यांची पत्नी ऑस्ट्रेलिया मध्ये एकांतात राहत आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, अँड्र्यू जॅक ला दोन दिवांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोणत्याच वेदना नव्हत्या.
दरम्यान, अँड्र्यूने ‘स्टार वॉर’ या गाजलेल्या चित्रपटांच्या सीरिजमध्ये जनरल इमॅटची भूमिका साकारली होती.