बेंगळूर/प्रतिनिधी
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या दोखेदुकी बनली आहे. ब्रुहत बेंगळूर महानगर पालीकेच्या (बीबीएमपी) च्या एका अधिकाऱ्याने रुग्णांना एक महत्वाची सूचना केली आहे. कोविड रुग्णांनी बीबीएमपीच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी घाई करू नये. ज्या रुग्णांचे स्वॅब घेतले आहेत त्यांचे अहवाल आल्यांनतर प्रशासन तुम्हाला उपचारासाठी तुम्हाला घेऊन जाईल असं म्हंटल आहे. नागरिक रुग्णालयांमध्ये गर्दी करत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. याविषयी बोलताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद बीबीएमपीचे आयुक्त बी.एच. अनिल कुमार यांनी बीएमला सांगितले की, शहरातील रुग्णालयांमध्ये बेडांची कमतरता नाही. तर कृत्रिमरित्या ही कमतरता तयार केली गेली आहे कारण लोक स्वत: खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करून घेत आहेत आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना न सांगता स्वत: रुग्णालयात दाखल होत आहेत असे ते म्हणाले.
अनिल कुमार यांनी एका घटनेचा दाखल देत म्हंटल आहे की, बऱ्याचवेळा रुग्ण स्वतः रुग्णवाहिका घेऊन रुग्णालये शोधू लागतात पण त्यांना रुग्णालयात दाखल होता येत नाही. अशीच एक बाब म्हणजे एका रुग्णाने, रुग्णालयात दाखल होण्यासाठी १० हून अधिक रूग्णालयात बेड शोधला पण त्याला बेड अभावी रुग्णालयात दाखल होता आले नाही. नंतर त्याला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोविड वार्ड रूममधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांना बेडची कमतरता भासू नये यासाठी सध्या बेडच्या उपलब्धतेवर व्यक्तिगतरीत्या लक्ष ठेवण्यात येत आहे.