आर्थिक संकटामुळे वाहन कंपनीने बंदचा निर्णय घेतल्याची माहिती
नवी दिल्ली
पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे एकामागून एक कंपन्या बंद होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. आता बातमी आली आहे की जपानची कार निर्माता कंपनी होंडाने पाकिस्तानमधील प्रकल्प 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. याअगोदर सुझुकीनेही पाकिस्तानमधील प्रकल्प बंद केला आहे.
होंडा अॅल्टलास कार्स, होंडा ऑटोमोबाईलचे पाकिस्तानमधील असेंबलर म्हणाले, ‘कंपनी आपले उत्पादन सुरू ठेवू शकणार नाही त्यामुळे 9 ते 31 मार्चपर्यंत आपला प्रकल्प बंद करत असल्याचे सांगितले आहे.’ कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला असून ऑटोमेकरने पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजला नोटीस पाठवली आहे.
पाकिस्तानी रुपयाच्या घसरणीमुळे कंपनीला तोटा
कंपनीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन आणि उच्च कराचा बोजा यामुळे कंपनीला आपला प्लांट बंद करणे भाग पडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या घसरणीमुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परदेशातून आयात महाग झाली आहे. त्याचवेळी, जास्त करामुळे, कारच्या मागणीत झपाट्याने घट झाली आहे. यामुळे प्रकल्प बंद करणे हाच पर्याय उरला आहे.
ऑटो पार्ट्स आयात करणे महाग
उत्पादनावर परिणाम करण्याव्यतिरिक्त, किमती वाढल्याने पाकिस्तानी लोकांच्या आधीच घसरलेल्या क्रयशक्तीवरही परिणाम झाला आहे. उच्च कर्ज घेण्याच्या खर्चाच्या परिणामांना पाकिस्तान झगडत आहे, ज्यामुळे मागणी कमी झाली आहे आणि पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. ऑटोमोबाईल पार्ट्सची आयात खूप महाग झाली आहे.