नवी दिल्ला
होंडा मोटार सायकल अँड स्कुटर इंडियाने बीएस-6 श्रेणीवर आधारीत एक्स -ब्लेड मोटारसायकल नुकतीच बाजारात उतरवली आहे. या गाडीची किंमत 1 लाख 5 हजार 325रुपये असणार आहे. ही गाडी कंपनीने 2018 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोत सादर केली होती. सिंगल डिस्क व डबल डिस्क प्रकारात येणारी ही गाडी 6 रंगात उपलब्ध असेल. अनेक वैशिष्टय़े बीएस-6 शेणीच्या या मोटारसायकलमध्ये कंपनीने देऊ केली असल्याचे सांगण्यात येते.