मुंबई
बीएस-6 शेणीवर आधारित लिवो ही जपानमधील होंडा कंपनीची नवी गाडी लवकरच बाजारात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. होंडाची गाडी नव्या अवतारात येणार असून अनेक वैशिष्टय़े या गाडीमध्ये असतील असं कंपनीच्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे. बीएस-6 श्रेणीतील आधुनिक इंजिनसह येणारी ही गाडी स्प्लेंडर व आयस्मार्ट या गाडय़ांना बाजारात टक्कर देईल, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.