नवी दिल्ली
दुचाकी वाहन निर्माती कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया यांनी 125सीसीच्या शाईन या गाडीच्या विक्रीचा एक कोटीचा यशस्वी टप्पा नुकताच पार केला आहे. कंपनीने सदरची नवी शाईन ही दुचाकी 2006 मध्ये बाजारात दाखल केली होती. नंतर 2010 मध्ये या गाडीने दहा लाखाचा विक्रीचा आकडा गाठला होता.
यापाठोपाठ 2014 मध्ये ही विक्रीची संख्या 30 लाखावर पोहचली होती. 2020मध्ये कंपनीने 90 लाख विक्रीचा आकडा गाठला. अलीकडेच एक कोटी गाडी विकण्याचा विक्रमी टप्पा कंपनीने पार केला आहे.