नवी दिल्ली
पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याच्या कारणास्तव होंडा मोटार कंपनीने आपल्या विदेशातील कारखान्यातील गाडय़ांचे उत्पादन काही काळासाठी थांबवले असल्याचे समजते. कंपनीच्या अमेरिका आणि कॅनडातील कारखान्यांमधील कार्सचे उत्पादन थांबवण्यात आले आहे.जपानमधील सदरील कंपनीला सध्या अनेक अडथळय़ांना सामोरे जावे लागत असल्याचे समजते. बंदरावरून होणारा पुरवठा थांबण्यासह मायक्रोचीपची टंचाई याचा परिणाम कार उत्पादनावर होताना दिसतो आहे. शिवाय गेल्या काही आठवडय़ापासून सदरील देशात तीव्र हिवाळाही जाणवू लागल्याने पुरवठय़ात व्यत्यय येतो आहे.