नवी दिल्ली
वाहन उद्योगातील जपानची कंपनी होंडा आपल्या वाहनांच्या किंमती ऑगस्टपासून वाढवणार असल्याचे समजते. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीने दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी व अमेझ या लोकप्रिय कार्स बाजारात आणणाऱया होंडाने सर्व प्रकारच्या मोटारींच्या किंमती वाढवण्याचे ठरवले आहे. पोलाद, धातु या अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खर्चाचा भार उत्पादनावर होत असून परिणामी सदरची वाढ करणे अपरिहार्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.