वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये प्रीमियम कार्समध्ये आघाडीवरची कार निर्मिती कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडने ‘द ग्रेट होंडा फेस्ट’ची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ग्राहकांसाठी खरेदीवर विशेष सवलती उपलब्ध करुन देण्याची योजना असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सदरच्या सणासुदीच्या काळात होंडाकडून आपल्या विशेष मॉडेल्सवर विविध आकर्षक ऑफर्स देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही सवलत योजना 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ग्राहय़ असणार आहे.
विशेष सवलतीची योजना
कंपनीकडून होंडा अमेझवर 47,000पर्यंत आणि 5 आवृत्तीवर 30,000 रुपयांपर्यंत होंडा झॅजवर 40,000 आणि होंडा सिव्हिकवर 2,50,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. जुनी होंडा कारची विक्री करावयाची असल्यास ग्राहकांना कंपनीकडून लॉयल्टी बोनस आणि विशेष एक्सचेंज लाभ मिळेल.