वाळपई/प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील होंडा नगरगाव व केरी मतदार संघाच्या उमेदवारांचे भवितव्य आज सीलबंद झाले. या मतदार संघाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांच्या निवडीसाठी आज घेण्यात आलेल्या मतदानात होंडा मतदार संघात 74ज्ञ् केरी मतदारसंघात 64 टक्के व नगरगां˜ा मतदारसंघात 65ज्ञ् मतदान झाले.
यासंदर्भाची मतमोजणी सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी वाळपई वन प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात सकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याची माहिती सत्तरी तालुक्मयाचे निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली.
यासंदर्भात माहिती अशी की सत्तरी तालुक्?यात एकूण तीन मतदारसंघ आहेत .यात नगरगाव केरी व होंडा मतदारसंघाचा समावेश आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाला अल्पसा प्रतिसाद लाभला .त्यानंतर मात्र हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढत गेली.काही पंचायत क्षेत्रांमध्ये मतदान 80 टक्के पर्यंत गेले आहे. केरी मतदारसंघातील दाबे वार्डात 80 टक्के मतदान झाले तर याच मतदारसंघातील मोर्ले कासारवाडा या ठिकाणी फक्त 42 टक्के मतदान झाले.
दुपारी पर्यंत 48 ज्ञ् मतदान.
दरम्यान निवडणूक अधिकारी जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रिया नुसार सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ करण्यात आला. सत्तरी तालुक्मयात जवळपास सर्वच मतदान केंद्रावर वेळेनुसार मतदान सुरू झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाला अल्पसा प्रतिसाद लाभला .त्यानंतर हळूहळू मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले. दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास 48 टक्के मतदान झाले होते .या संदर्भात माहिती वाळपईच्या निवडणूक अधिकाऱयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली. तीन वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर जवळपास 55 टक्के मतदान झाले होते.
मतदारांचा उत्साह गला.
दरम्यान विधानसभा लोकसभा पंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज घेण्यात आलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये मात्र मतदारांनी उत्साह दाखविला नाही. संबंधित राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना पुन्हा पुन्हा घरी जाऊन मतदानासाठी आग्रह करीत होते. यामुळे काही प्रमाणात मतदान टक्केवारी वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले .अनेकवेळा मतदारांनी मतदान कशासाठी करावे अशा प्रकारचा सवाल करुन आमचे अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कामे झालेले नाही अशा प्रकारचे सवाल करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
अधिकाऱयाच्या वाहनाला शुक्रवारी अपघात.
दरम्यान नगरगाव मतदारसंघातील निवडणुकीचे पूर्वतयारी या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी जाणाऱया क्षेत्रीय अधिकाऱयांच्या वाहनाला बिंबल सतरी या ठिकाणी अपघात झाला. एका वळणावर चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटून पडली. यामुळे अधिकारी व सदर वाहनांमध्ये असलेल्या इतर कर्मचाऱयांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. या संदर्भाची माहिती मिळतात तालुक्मयाचे निवडणूक अधिकारी राजेश अजगावकर मामलेदार दशरथ गावस इतरांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन यासंदर्भात मदत करण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये अडकून राहिलेल्या कर्मचाऱयांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी यापूर्वी सदर अधिकाऱयांना गाडीतून बाहेर काढून वाळपई सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संध्याकाळी कोवीड रुग्णाकडून मतदान.
दरम्यान निवडणूक अधिकाऱयांनी जाहीर केल्यानुसार संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत कोवीड मतदानासाठी हक्क बजाविला. मतदान केंद्रावर रुग्णांनी पीपीई किट घालून मतदान केले .यावेळी संबंधित मतदान केंद्रावरील कर्मचाऱयांनी विशेष सतर्कता बळावले होती. अशाप्रकारे ही विचित्र स्वरूप पाहताना अनेक नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.निवडणूक अधिकाऱयांनी या संदर्भात व्यवस्था केली होती. या संदर्भाची माहिती क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱयांना देण्यात आली होती. त्यानुसार हे मतदान पार पाडण्यात आले.
सर्वच उमेदवारांना जिंकण्याची आशा.
आज घेण्यात आलेल्या मतदान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी छोटय़ा समस्या निर्माण झाल्या. मात्र निवडणूक अधिकाऱयाकडून चांगल्या प्रकारची सोय केल्यामुळे यासमस्या दूर झाल्या.. दरम्यान सर्वच उमेदवारांनी जिंकण्याची आशा व्यक्त केलेली आहे. केरी मतदार संघाच्या भाजपचे उमेदवार देवयानी गावस यांनी आपण मोठय़ा मतांनी जिय होणार असल्याचा दावा केला आहे. आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळे आपले विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात मेहनत घेतल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्याने स्पष्ट केलेले आहे. तर यात मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार परिणीता राणे यांनी ही विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे. विद्यमान भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या समस्याच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेले मतदार काँग्रेसलाच मतदान करतील अशा प्रकारची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नगरगाव भाजपाच्या उमेदवार राजश्री काळे व काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उषा मेस्त यांनी जिंकण्याची दावा केलेला आहे. होंडा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे .याठिकाणी भाजपाचे सगुण वाडकर काँग्रेस पक्षाचे रमेश गावडे यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. तर अपक्ष उमेदवार गणपत गावकर यांनी मतदारांनी आपल्याला मोठय़ा प्रमाणात मतदान केल्यामुळे आपला विजय होणार असल्याचा दावा केला आहे.