वाळपई/प्रतिनिधी
होंडा पंचायतीच्या माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्त्या तुळशी न्हावेलकर यांचे आज गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अल्प आजाराने निधन झाले.त्या 57 वर्षाच्या होत्या.
होंडा पंचायतीच्या माजी उपसरपंच व महिला कार्यकर्तया आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी विशिष्ट अशी आपली ओळख निर्माण केली होती. महिला विकास व महिलांसाठी अनेक स्तरावर उपक्रम राबवून त्यांना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.त्या महिला व बालविकास कल्याण खात्याच्या निवृत्त कर्मचारी होत्या. नोकरीमध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून होंडा पंचायतीच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. निवडून आल्यानंतर त्या पंचायतीच्या उपसरपंच बनल्या. आपल्या पदाचा फायदा त्यांनी समाजाच्या विकासासाठी केला. समाजामध्ये निर्माण होणाऱया अनेक अडचणी व प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदत करण्याचे कार्य त्यांचे वाखाणण्याजोगे होते. सत्तरी तालुक्मयामध्ये त्यांनी विशिष्ट अशी आपली प्रतिमा निर्माण केली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्यामुळे त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली .उत्तरीय तपासणीनंतर संध्याकाळी होंडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील त्यांचे समर्थक नागरिक यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. संध्याकाळी होंडा येथील स्मशानभूमीत धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने प्रती अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे.
याबाबत आपली शोकभावना व्यक्त करताना होंडा पंचायतीचे सरपंच आत्माराम गावकर यांनी सांगितले की तुळशी नावेलकर यांच्या माध्यमातून होंडा भागांमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्यामध्ये वलय निर्माण झाले होते. प्रत्येकाला मदत करण्याची त्यांचा स्वभावगुण यामुळे त्यांनी समाजामध्ये एक आदर्श स्थान प्राप्त केले होते. त्यांच्या निधनामुळे होंडा भागातील सामाजिक व वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये पोकळी निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.