नवी दिल्ली
होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया(एचएमएसआय) यांची वाहन विक्री डिसेंबर 2020 मध्ये तीन टक्क्यांनी मजबूत होत 2,63,027 युनिट्वर राहिली आहे. कंपनीने डिसेंबर 2019 मध्ये 2,565,283 वाहनांची विक्री केली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये देशातील बाजारामधील विक्री पाच टक्क्यांनी वधारुन 2,42,046 युनिट्वर राहिली आहे, जी मागील वर्षातील समान महिन्यामध्ये 2,30,197 इतकी होती. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये देशातील विक्री ही वर्षाच्या आधारे पाहता पाच टक्क्यांच्या मजबूतीसोबत 11,49,101 इतकी राहिली होती. किरकोळ आणि घाऊक विक्री डिसेंबर 2020 मध्ये समाधानकारक राहिल्याने 2021 मधील प्रारंभाचा प्रवास हा मजबूत राहणार आहे, असे मत विक्री आणि एचएमएसआयचे संचालक यादविंदर सिंह गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.