वार्ताहर/ काकती
होनगा येथील विरशैव लिंगायत स्मशानभूमीत विविध विकासकामे करण्यात आली असून नूतन शेडचे लोकार्पण मारुती अष्टगी यांच्या हस्ते फित कापून नुकतेच करण्यात आले.
होनगा विभागाचे भाजप अध्यक्ष बसवराज चचडी यांच्या प्रयत्नातून आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या पाच लाख रुपयांच्या निधीतून होनगा स्मशानभूमीत नूतनशेड बांधण्यात आले. या स्मशानभूमीला ग्रा. पं. सदस्य तुकाराम कुंभार यांच्या निधीतून तीन लाख रुपये व आमदार कवटगीमठ यांच्या निधीतून दोन लाखांचे कंपाऊंड बांधण्यात आले आहे. उद्योजक शंकर गुड्स यांनी शव नेण्यासाठी 28 हजार रुपयांची तिरडी लोकार्पण केली.
यावेळी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुंभार, बसवराज चचडी, तुकाराम कुंभार, इराप्पा पुजारी, बाळू पुजारी, बसू पुजारी, शंकर पुजारी व लिंगायत समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते.