प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ कारला अपघात होऊन रत्नागिरीचा युवक जखमी झाला. रविवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे.
ऋषिकेश भोसले (वय 34) रा. रत्नागिरी असे जखमीचे नाव आहे. या तरुणावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. यासंबंधी काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता या घटनेची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.